12 आठवडयाच्या आसपास आतडयाच्या
हालचाली सुरू होऊन
सुमारे सहा आठवडे सुरू राहतात.
गर्भाच्या व नवजाताच्या आतडयानी प्रथम
बाहेर फेकलेल्या पदार्थास
मेकोनिअम म्हणतात.
ते पाचक स्त्राव, प्रथिने
आणि पचनसंस्थेच्या मार्गाने
टाकलेल्या मृत पेशींच
बनलेले आहे.
या आधी आढळलेल्या मागे जाण्याच्या
प्रतिसादाचे ऐवजी
तोंडाजवळील उद्दीपन आता
उद्दीपकाचे दिशेने वळणे व तोंड उघडणे
असा प्रतिसाद निर्माण करते.
या प्रतिसादाला रूटिंग प्रतिक्षिप्त
क्रिया म्हणतात
ती जन्मानंतर कायम रहाते आणि
नवजात शिशुला स्तनापानाच्या दरम्यान
त्याच्या आईची स्तनाग्रे
शोधण्यास मदत करते.
जरी सहा आठवडयाच्या गर्भाच्या
हालचाली सुरू होतात
गर्भवती स्त्रीला गर्भाच्या हालचाली
१४ ते १८ आठवडयाच्या दरम्यान
प्रथम जाणवतात.
पारंपरिकरित्या हया घटनेस
क्विकनिंग म्हणतात