ढोबळमानाने 2 1/2 आठवड्यापर्यन्त
एपीब्लास्ट
तीन विशेष पेशी-आवरण,
निर्माण करतो
ज्यास एक्टोडर्म,
एंडोडर्म,
आणि मेसोडर्म म्हणतात.
एक्टोडर्मपासून अगणित संरचना
निर्माण होतात
ज्यात मेंदू,
मज्जारज्जु,
मज्जातंतु,
त्वचा,
नखे,
आणि केसांचा समावेश आहे.
एन्डोडर्म श्वसनसंस्थेच्या आतील मृदू त्वचा
पचनसंस्थेचा मार्ग
आणि यकृत व
स्वादुपिंडासारख्या प्रमुख
अवयवांच्या संरचनांची निर्मीती करते
मेसोडर्म हृदयाची
किडनी
हाडे,
मृदूअस्थि
स्नायु
रक्तपेशी
आणि अन्य संरचनांची निर्मिती करते.