एकपेशीय मानवी बिजांड ज्या
गतिमान प्रक्रियेद्वारा
100 खरबपेशींचे विकसीत शरीर
होते ही कदाचित
निसर्गाची सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण
प्रक्रिया आहे.
संशोधकांना आता माहित आहे की
पूर्ण विकसीत शरीराद्वारा
केल्या जाणाया नित्याच्या अनेक क्रिया
बहुतेक वेळा जन्माच्या खूप आधी,
गर्भावस्थेच्या दरम्यान स्थापित होतात.
जन्मपूर्व विकासाचा कालावधी
पूर्वतयारीया काळ मानला जातो
ज्याचे दरम्यान विकसनशील मनुष्य
जन्मानंतरच्या अस्तित्वाकरीता
अनेक संस्था प्राप्त करतो
आणि आवश्यक कौशल्यांचा सराव करतो.
Chapter 2 Terminology
गर्भधानापासून अथवा
लैंगीक संबंधा पासून
मोजली असता जन्मापर्यन्त
मनुष्याची गर्भावस्था ढोबळमानाने
३८ आठवडयाची असते.
गर्भधानानंतरच्या प्रथम
८ आठवडयाचे दरम्यान
विकसनशील मानवी शरीरास
भ्रुण म्हणतात
ज्याचा अर्थ 'आंत वाढणारा' असा होतो.
भ्रुण अवस्थेचा काल म्हटला जाणार्या
ह्या, कालावधीत शरीरातील अधिकतर
मुख्य संस्था निर्माण होतात.
८ आठवडयांच्या पूर्तीपासून
गर्भावस्थेच्या शेवटापर्यन्त
विकसनशील मानवी शरीरास
गर्भस्थ शिशु म्हणतात
ज्याचा अर्थ न जन्मलेले तान्हुले
असा आहे.
गर्भावस्थेच्या या कालवधीत,
शरीर विकसीत होते आणि त्यातील संस्था
काम करण्यास सुरवात करतात.
सर्व गर्भावस्थीय व भ्रुणाच्या अवस्थांचे
वर्णन या कार्यक्रमात
गर्भधानानंतरच्या कालावधीच्या
संदर्भात केले आहे.