अनेक संशोधकांना आढळले आहे की
तीव्र ध्वनी
गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
करू शकतो.
तत्काल परिणामात,
लंबित वर्धित हृदयगती, गर्भाची सूज
आणि वर्तनातील विस्कळीत बदल
यांचा समावेश होतो.
संभाव्य दिर्घकालीन परिणामात
बहिरेपणाया समावेश होतो.
गर्भावस्थेच्या तिसर्या तिमाहीचे दरम्यान
गर्भाने उपयोग केलेल्या उर्जेच्या
५० टक्कयांपेक्षा जास्त उर्जा
मेंदूच्या गतिमान वाढी करता
वापरली जाते.
मेंदूचे वजन ४०० ते ५०० पटीने वाढते.
वासाचे संवेदन सक्रिय होण्या करता आवश्यक
असलेले सर्व घटक काम करू लागतातं.
समयपूर्व जन्मलेल्या शिशुंचे अध्ययनात
गंध ओळखण्याची क्षमता
गर्भाधानानंतर २६ व्या आठवडयांनी दिसते.
गर्भाशयातील द्रवात मधुर पदार्त ठेवल्यास
गर्भाचो द्रव गिळण्याची गती वाढते.
या उलट कडू पदार्थ ठेवल्याने
गर्भाची द्रव गिलण्याची गती मंद होते.
पायांची पायर्या चढल्याप्रमाणे हालचाल
त्वचेखाली अधिक चरबी जमा झाल्याने
गर्भाच्या सुरुकुत्या कमी होतात.
शरीराचे तापमान सुरक्षित राखण्यात
आणि जन्मानंतर ऊर्जा संग्रहण करण्यात
चरबीची महत्वपूर्ण भूमिका असते.
Chapter 44 7 to 8 Months (28 to 32 Weeks): Sound Discrimination, Behavioral States
गर्भावस्थेच्या शेवटच्या चार
महिन्याच्या दरम्यान
गर्भ समन्वित हालचाली अधूनमधून
विश्रांती घेत काही काळ करतो.
वर्तनाच्या या अवस्था
मध्यवर्ती मज्जा संस्थेच्या
सतत वाढत्या व्यामिश्रता दर्शवतात.
Chapter 45 8 to 9 Months (32 to 36 Weeks): Alveoli Formation, Firm Grasp, Taste Preferences
विविध पदार्थांशी गर्भाचा परिचय
जन्मानंतरच्या चवीच्या आवडी-निवडीकर
परिणाम करतो.
उदाहरणार्थ ज्या गर्भांच्या आईने सौफचा
(एक पदार्थ जो लिकॅरिसला स्वाद देतो)
स्वाद घेतला असतो ते
जन्मानंतर सौफ खाणे पसंद करतात.
गर्भावस्थेत सौफशी परिचय न झालेल्या
नवजातांना सौफ आवडत नाही.
Chapter 46 9 Months to Birth (36 Weeks through Birth)
एस्ट्रोजेन नामक हार्मोनची निर्मिती करून
गर्भ श्रम करण्यास सुरवात करतो
आणि यापद्दतीने गर्भावस्थेतून नवजात
अवस्थेकडील स्थित्यंतराचा प्रारंभ करतो.
प्रसूतीचा वेळी गर्भाशयाचे जोरदार
संकोचन होते व
परिणामी शिशुचा जन्म होतो.
गर्भधानापासून जन्मापर्यन्त व
नंतर मानवी विकास गतिमान,
निरंतर व व्यामिश्र आहे.
या आश्चर्यमुग्ध करणार्या प्रक्रियेचे
नवे संशोधन वाढत्या प्रमाणात
गर्भ विकासाचा प्रभाव
आयुष्यभरच्या आरोग्यावर दर्शवते.
आपले प्रारंभिक मानवी विकासाचे ज्ञान
जसे वृद्धिंगत होइल
तशी आपली जन्मापूर्वीचे व जन्मानंतरचे
आरोग्य वर्धित करण्याची क्षमता वाढेल.