चार व पाच आठवडयामध्ये
मेंदूचा गतिमान विकास सुरू असतो
आणि तो पाच सुस्पष्ट हिश्श्यात विभाजित होतो.
मस्तक गर्भाच्या एकूण आकाराच्या १/३ असते.
अग्रभागी अर्द्धगोलार्द्ध दिसू लागतात,
ते हळूहळु मेन्दूचे सर्वात
मोठे हिस्से बनतात.
अग्रभागीय अर्द्धगोलार्द्ध द्वारा
नियंत्रित कार्यात
विचार करणे, शिकणे,
स्मृती, बोलणे, दृष्टी
ऐकणे, स्वैच्छिक हालचाली,
आणि समस्या सोडवणे यांचा समावेश होतो.